
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या पहिल्यावहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीग (एसकेसीएल) टी-20 स्पर्धेची फटकेबाजी मंगळवारपासून पोलीस जिमखान्यावर सुरू होतेय. सहा संघांचा सहभाग असलेल्या या लीगचा उद्घाटनीय सामना आरडी ब्लास्टर्स विरुद्ध स्वराज इलेव्हन यांच्यात रंगेल. ही लीग 18 ते 28 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील विविध मैदानांवर खेळविली जाणार आहे. अध्यक्ष प्रवीण महाले, सचिव जयंत पाटील व स्पर्धा संचालक दीपक पाटील यांच्या पुढाकाराने ही लीग खेळवली जाणार आहे.
या लीगसाठी 25 ऑक्टोबरला निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर 27 व 28 ऑक्टोबरला खेळाडूंची निवड करण्यात आली. तसेच 2 नोव्हेंबरला सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती सभागृहात खेळाडूंचा लिलाव मोठ्या दिमाखात पार पडला होता. तब्बल 196 खेळाडूंनी या लीगसाठी आपली नावनोंदणी केली होती आणि त्यापैकी 90 खेळाडूंला लिलावात खरेदी करण्यात आले. या लीगमधील सुरुवातीचे सामने सात सामने पोलीस जिमखान्यावर आणि उर्वरित सामने बोईसरच्या पीडीटीएसए मैदानावर खेळविले जातील, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण महाले यांनी दिली. या लीगमध्ये विजेत्या संघाला एक लाखाचे तर उपविजेत्यांना 50 हजार रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे.
एसकेसीएलचे सहा संघ
सूर्यवंशी वॉरियर्स, आरडी ब्लास्टर्स, स्वराज इलेव्हन, इन्स्पायर्ड रॉयल्स, सिंबा सिक्सर्स, प्राईड ऑफ पालघर इलेव्हन.




























































