सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांवर सलमानने अखेर मौन सोडले, म्हणाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील राजकारण, घराणेशाही, नेपोटिझम पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे. सामान्य लोकांसह सिनेअभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यावर आता खुलेपणाने बोलताना दिसत आहे. यामुळे निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान आणि बड्या कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सुशांतच्या आत्महत्येपासून सलमान खान याच्यावरही आरोप होत आहे. आता सहा दिवसानंतर त्याने सुशांतच्या आत्महत्येबाबत होत असलेल्या आरोपांवर मौन सोडले आहे.

अभिनेता सलमान खान याने ट्विटरवरून सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील सदस्यांना या कठीण काळात साथ देण्याचे आवाहन केले आहे. माझी चाहत्यांना अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांसोबत उभे राहा. त्यांनी वापरलेल्या भाषेकडे दुर्लक्ष करून त्यामागील भावना समजून घ्या. त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या, कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायक असते, असे ट्विट सलमान खान याने केले आहे.

अभिनव कश्यपचे आरोपांवर आरोप
सलमान खानवर सुशांतच्या आत्महत्येनंतर विविध आरोप लावण्यात आले आहेत. ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान आणि त्याच्या कुटुंबावर टीका केली. सलमानने माझी कारकीर्द संपवली असा आरोप अभिनव कश्यप यांनी केला. तसेच त्याच्या Being Human संस्थेत चॅरिटीच्या नावाखाली हवालाचा गोरखधंदा चालतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

‘Being Human’ संस्थेत चॅरिटीच्या नावाखाली मनी लॉन्ड्रिंगचा धंदा, दिग्दर्शकाचा सलमान खानवर गंभीर आरोप