सुशांतच्या आत्महत्येचे गूढ कायम, पोलिसांनी 13 जणांचे जबाब नोंदवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत 13 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रविवारी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली.वांद्रे पोलिसांनी त्याच्या आत्महत्ये प्रकरणी आता पर्यंत 13 जणांचे जबाब नोंदवले आहेत. प्रत्येकाच्या जबाबात पोलिसांना वेग वेगळी माहिती मिळत आहे. त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी तपासासाठी तीन पथक तयार केली आहे. एक पथक त्याचे पुटुंब, दुसरे बॉलिवूड आणि तिसरे पथक हे त्याने नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा शोध घेणार असल्याचे समजते. तपासादरम्यान पोलिसांना यश राज फिल्मकडून करारनाम्याची प्रत मिळाली आहे. त्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

नियमानुसार कारवाई – अनिल देशमुख
चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी अजून काही जणांचे जबाव घेण्याचे काम शिल।क आहे. चौकशीनंतर नियमानुसार कारवाई होईल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, य आत्महत्येप्रकरणी झोन नऊचे डीसीपी चौकशी करीत आहेत. पोलिसांनी अनेकांचे जबाव घेतले आहेत. अजून काही जणांचे जवाब घेण्याचे काम शिल्लक आहे. चौकशीनंतर नियमानुसार कारवाई होईल असे त्यांनी स्पष्ट केले.