‘या’ अभिनेत्याच्या बहिणीला जडलाय भयंकर आजार, ट्विटरवरून मागितली मदत

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता व सावधान इंडियाचा सूत्रसंचालक सुशांत सिंग याच्या बहिणीला एका भयंकर आजाराने ग्रासले असून तिच्यावरील उपचारांसाठी सुशातने ट्विटरवरून मदत मागितली आहे. सुशांतची लहान बहिण सोफियाला मज्जासंस्थेशी संबंधित CDIP हा आजार जडला असून त्यामुळे हळूहळू तिच्या शरीरातील ताकद कमी होऊ लागली आहे.

या आजाराविषयी सुशांत सिंगने ट्विट करत या आजारवर कुठे चांगल्याप्रकारे उपचार होऊ शकतात याची माहिती देण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. ‘माझी बहिण सोफियाला CDIP हा आजार झाला आहे. हा एक ऑटो इम्यून डिसॉर्डर आहे. यावर स्टिरॉईड्स हे एकमेव उपचार आहेत मात्र त्याचाही काही उपयोग झालेला नाही. कृपया मला यावर कुठे चांगले उपचार मिळतील ते सांगा’, असे ट्विट केले आहे.

SUMMARY : Sushant Singh’s Sister Diagnosed With CIDP; Seeks Help