सुशील, साक्षी, पुन्हा ए श्रेणीत

21

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऑलिम्पिक चॅम्पियन सुशीलकुमार व साक्षी मलिक या दोघांचा बीमधून पुन्हा ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाकडून (डब्ल्यूएफआय) हा बदल करण्यात आलाय. याआधी करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दोघांनाही बी श्रेणीत स्थान देण्यात आले होते. आमच्याकडून चुकून असे घडले होते, असे डब्ल्यूएफआयकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या टाटा मोटर्सच्या कुस्ती डेव्हलपमेण्ट प्रोगाममध्ये सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या