शिरसाटांना क्लीनचिट हा तर एकतर्फी निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सवंग आणि थिल्लर भाषा वापरणाऱया आमदार संजय शिरसाट यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचे ते सांगत असले तरी ही चौकशी कधी झाली? मी स्वतŠ तक्रारदार असताना मला एकदाही बोलविण्यात आले नाही. त्यामुळे हा एकतर्फी निकाल असून याबाबत राज्याचे गृहमंत्री आणि स्वत: वकील असलेले देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

संभाजीनगरमधील आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत जाहीर सभेत अर्वाच्च भाषेचा वापर केला होता. याविरोधात अंधारे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच, न्यायालयात देखील खटला दाखल केला आहे. मात्र, दोन दिवसांपुर्वी यातील आरोपी असलेले शिरसाट यांनी आपल्याला पोलिसांनी क्लिन चीट दिल्याचे सांगितले. त्यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, शिरसाट यांनी जी भाषा वापरली त्याचा व्हिडीओ सर्वत्र उपलब्ध आहे. तरी देखील त्यांना क्लिन चिट कशी मिळाली. तसेच, यात मी स्वतŠ तक्रारदार असून पोलिसांकडून मला चौकशीला बोलविण्यात आले नाही. मग हा निकाल कसा लावला. एकीकडे शितल म्हात्रे प्रकरणात ओरिजनल व्हिडियो दाखवता येत नाही, तरी गुन्हे दाखल केले जातात. दुसरीकडे मात्र व्हिडियो उपलब्ध असताना कारवाई होत नाही. यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने काय चौकशी केली. त्याचा अहवाल महिला आयोगाकडे जाण्याअगोदर यात आरोपी असलेल्या आमदाराकडे कसा गेला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.