निलंबित पीएसआय रणजित कासलेला अटक

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चर्चेत असणारे निलंबित उपनिरीक्षक रणजित कसलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या महिन्यात भांडुप येथील एका कार्यकर्त्याने कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी कासलेविरोधात गुन्हा नोंद केला होता. तसेच कासलेने नुकतेच सोशल मीडियावर राजकीय नेत्यावर टिप्पणीदेखील केली होती. जातीय द्वेष पसरवणे, अधिकाऱ्याची बदनामी करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करण्याच्या आरोपाखाली कासलेला दिल्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.