स्वामी नरेंद्रचार्य शनिवारी बोरिवलीत, भक्तांना करणार मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज  हे मुंबईत येणार असून आपल्या भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत. स्वामी मुंबई मध्ये भाटिया बाळरक्षक विद्यालय सोसायटी हॉल, लोकमान्य टिळक रोड, वीर सावरकर गार्डन जवळ, बोरीवली (पश्चिम) मुंबई या ठिकाणी दिनांक ३ व ४ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन करतील.

जगद्गुरुश्रींनी, “तुम्ही जगा  दुसऱ्याला जगवा” हा संदेश  विश्वाला प्रदान केला आहे. मनुष्य देह मिळाल्यानंतर या जन्माचे नेमके प्रयोजन काय हे कळणे गरजेचे आहे, आध्यात्मिक विचारधारनेतुन जीवनाचा आनंद शोधण्याचा मार्ग अवघ्या विश्वाला दाखविला तो म्हणजेच, दिवसातून फ़क्त दहा मिनिटे भक्ति करा आणी स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचे वाईट चिंतू नका असे आवाहन स्वामींनी केले आहे. या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.