स्वप्नील जोशीच्या भेटीसाठी चाहत्याला पाच हजारांचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी चाहते उत्सुक असतात. परंतु त्याचा गैरफायदा घेणारेही अनेक असतात. स्वप्नील जोशीच्या चाहत्याचा असाच कोणीतरी गैरफायदा घेऊन त्याला पाच हजारांचा चुना लावला आहे.

स्वप्नील जोशीची भेट घालू देतो असे सांगून एका व्यक्तीने स्वप्नीला जोशीच्या चाहत्याकडे पाच हजारांची मागणी केली. त्या चाहत्याने तसे पैसेही त्याला दिले परंतु स्वप्नील जोशीची भेटीच्या ऐवजी स्वपनीलचा फोटो दिला. ही बाब स्वप्नील जोशीला कळाली त्याने ट्विटरवर अशा भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे.