
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सत्ताधारी पक्ष भाजपच्या विरोधात अभिनेत्री स्वरा भास्करने आघाडीच उघडली होती. त्यासाठी तिने विरोधी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारही केला होता. परंतु स्वराची ही सगळी मेहनत वाया जाताना दिसत आहे. त्याचे कारण ज्या उमेदवारांसाठी स्वराने प्रचार केला होता ते उमेदवार पराभवाच्या छायेत दिसत आहेत.
स्वरा भास्करने भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यासाठी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात प्रचार केला होता. परंतु सध्या समोर येत असलेल्या निकालांवरून दिग्विजय पिछाडीवर आहेत आणि साध्वींची जिंकण्याची शक्यता अधिक आहे.
तसेच माकपचे उमेदवार अमरा राम यांच्यासाठी स्वराने प्रचार केला होत ते 17 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. आपच्या आतिशी मार्लेना, कम्युनिस्ट पक्षाचा कन्हैय्या कुमार हे सुद्धा पराभूत होण्याची अधिक शक्यता आहे.






















































