नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांचा शपथविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना गुरुवारी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांचा समावेश आहे.

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले गृह राज्यमंत्री सतेज पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे आणि वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते व ज्येष्ठ सदस्य दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.