
अनेक देशात आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती जर वाचली तर तिच्यावर गुन्हा दाखल होतो. मात्र आता एका देशाने आत्महत्या करण्यासाठी एक मशीन तयार केली असून त्याला कायदेशीर मान्यता देखील मिळाली आहे. या मशीनमध्ये माणूस एक मिनिटाच्या आत मरू शकतो असा दावा मशीन तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे.
ही मशीन शवपेटीच्या आकाराची असून त्यात ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी ठेवलेला आहे. त्यामुळे त्यात झोपलेला व्यक्ती तासाभरात मृत्यूमुखी पडतो. एग्जिट इंटरनॅशनल या कंपनीचे डॉ. फिलिप निट्स्के यांनी ही मशीन बनवली आहे. या डॉक्टरांना डॉ. डेथ म्हणून देखील ओळखले जाते. स्विच्छरलँडमध्ये इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षी स्विझरलँडमध्ये 1300 लोकांनी त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने आत्महत्या केल्या आहेत.
या मशीनच्या आधारे ज्यांना मरणाची इच्छा आहे किंवा जे अक्षरश: अंथरूनाला खिळून आहेत त्यामुळे त्यांची जगण्याची इच्छा संपलेली आहे. अशा व्यक्ती या मशीनचा वापर करून आयुष्य संपवू शकतात. व त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या मशीनमध्ये झोपलेल्या व्यक्तीने तिच्या पापण्या हलवल्या की त्यानंतर काहीमिनिटातच त्याचा मृत्यू होतो.





























































