हिंदुस्थान-न्यूझीलंडमध्ये आज ‘करो या मरो’ची लढाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या संघांना टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सुपर-12 लढतीत हार पत्करावी लागली. हे उभय संघ दुसऱया सुपर-12 सामन्यात उद्या रविवारी रात्री भिडणार आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी या दोन्ही संघांसाठी उद्याचा सामना ‘करो या मरो’ असाच असेल. यातील जो संघ हरेल त्याला कदाचित सुपर-12 फेरीनंतर बॅगा भरून घरचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यामुळे विराट कोहलीची टीम इंडिया आणि केन विल्यम्सनचा न्यूझीलंड संघ आज अटीतटीची झुंज बघायला मिळेल यात वादच नाही.

इतिहास बदलण्याची वेळ

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच हिंदुस्थानला पराभूत करून इतिहास बदलवला. त्याचप्रमाणे टी-20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानला अद्याप न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी यावेळी विराट सेनेला इतिहास बदलविण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावाले लागणार आहे.

आजच्या लढती 

अफगाणिस्तान विरुद्ध नामिबिया

गट 2 – अबुधाबी

दुपारी 3ः30 वाजता

हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड

गट 2 – दुबई

रात्री 7ः30 वाजता