पुढचा वर्ल्ड कप कोणत्या देशात? क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयवर अवलंबून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीने या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या निर्णयामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असला तरी आता हा वर्ल्ड कप कोणत्या वर्षी खेळवण्यात येणार आहे? याचा प्रश्न सुटलेला नाही. आयसीसीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरणही दिलेले नाही. आयसीसीच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 2021 सालामध्ये हिंदुस्थानात टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. अशा परिास्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2022ा ामध्ये या स्पर्धेचे आयोजन करावे लागू शकते, पण आयसीसीकडून अधिकृतपणे याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. यावेळी पुढील दोन टी-20 र्ल्ड कपचे वर्ष व तारखा निाश्चित करण्यात आलेल्या आहेत, पण आयोजनाचे ठिकाण सांगण्यात आलेले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यंदाचा टी-२० वर्ल्ड कप पुढल्या वर्षी आयोजित करावयाचा असल्यास त्यांना बीसीसीआयकडे तशी मागणी करावी लागणार आहे. दोन बोर्डांच्या संमतीनंतरच पुढल्या दोन्ही वल्र्ड कपच्या आयोजनाचे ठिकाण निश्चित होईल, असेही आयसीसी सांगितले.

तिकीट खरेदी करणाऱ्याना दिलासा
या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वल्र्ड कप लढतींची तिकिटे विकली गेली आहेत. मात्र कोरोनामुळे आयसीसीकडून सोमवारी टी-20 वल्र्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. आता तिकिटे खरेदी करणाऱ्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झालाय. आयसीसीकडून त्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले की, जर 2021 सालामध्ये ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यास हीच तिकिटे कायम राहतील. क्रिकेटप्रेमींना याच तिकिटांवर लढती पाहायला मिळतील, पण 2021 सालामध्ये हिंदुस्थानात टी-20 वल्र्ड कप झाल्यास तिकीट खरेदी करणाNयांना तिकिटांचे पैसे रिटर्न देण्यात येतील. डिसेंबर 2020पर्यंत ही प्रकिया सुरू राहील. तिकिटांच्या पैशांच्या परताव्याची मागणी केल्यानंतर30 दिवसांच्या आत पैसे परत देण्यात येतील, असे आयसीसीने सांगितले.

2021 चा वर्ल्ड कप हिंदुस्थानातच!
बीसीसीआयला 2021 सालामधील टी-20 वल्र्ड कप हिंदुस्थानातच व्हावा असे वाटते. कारण 2023 सालामध्ये हिंदुस्थानात वन-डे वल्र्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. 2021 सालातील वल्र्ड कपच्या आयोजनाचा मान क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला तर हिंदुस्थानात 2022 सालामध्ये टी-20 वल्र्ड कपचे आयोजन करावे लागेल. अशा परिस्थितीत सलग दोन वर्षी हिंदुस्थानात वर्ल्ड कपचे आयोजन झाल्यास जाहिरातदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही तर बीसीसीआयला मोठा महसूल गमवावा लागणार आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जरी मागणी करण्यात आली असली तरी बीसीसीआय मान्य करणार नाही असेच सध्या तरी चित्र दिसत आहे. याचा अर्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2022 सालामध्येच टी-20 वर्ल्ड कप खेळवावा लागणार आहे.