रस्त्यावर उभ्या गाडीच्या बॉनेटवर जोडप्याने केलं सेक्स, पण ‘गुगल’ आलं अडचणीत!

56086

आक्षेपार्ह विधानं, शब्द, फोटो किंवा व्हिडीओ यांच्यावर कडक कारवाई करणारं गुगल एका जोडप्यामुळे अडचणीत आलं आहे. एका जोडप्याने निर्जन रस्त्यावर केलेल्या सेक्समुळे गुगलला त्याच्याकडील फोटो डिलीट करायची वेळ आली आहे.

त्याचं झालं असं की, तैवानमधील पर्वतीय प्रदेशातील एका निर्जन रस्त्यावर गाडी उभी करून एक जोडप्याने गाडीच्या बोनेटवरच सेक्स केलं. आसपास कुणीही नसल्याने त्यांचे हे खासगी क्षण खासगीच राहतील असा जोडप्याचा कयास होता. पण, झालं भलतंच. तैवानचे रस्ते दाखवणाऱ्या गुगल मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱ्यात त्यांचा विवस्त्रावस्थेतला फोटो झळकला. सुरुवातीला एका निर्जन रस्त्यावर गाडी उभी असलेलं दृश्य दिसत होतं. मात्र, स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱ्यातील 360 अंशातील चित्र दाखवणाऱ्या खास फीचरमुळे जोडप्याचे खासगी क्षण चित्रीत झाले.

सोशल मीडियावर एका युजरने सर्वप्रथम हे फोटो पाहिले. फोटोत एखाद्या जनावराला शोधा, अशा पद्धतीचा फोटो वाटल्याने युजरने 360 अंशात कॅमेरा फिरवला आणि त्याला ते दृश्य दिसलं. हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी गुगलवर टीका केली. कारण, इंटरनेटवरील आशयातून नग्नता हद्दपार करण्याचं धोरण गुगलने 2018मध्ये स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार संबंधित आक्षेपार्ह आशयांवर कारवाईही केली होती. आता याच धोरणामुळे गुगलच्या मॅप दर्शवणाऱ्या फोटोंच्या यादीतून तो अडचणीत आणू पाहणारा फोटो गुगलला डीलिट करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या