
नोकरीसाठी म्यानमारमध्ये नेलेल्या तरुणांना सायबर क्राइमसाठी जुंपल्याची घटना उघडकीस आली आहे. भामटय़ांनी मीरा-भाईंदरसह अन्य राज्यातील तरुणांना बँकॉक, थायलंड येथे फेसबुक पंपनीत दरमहा 30 हजारांच्या पगारावर नोकरी देतो असे आमिष दाखवून नेले आणि तेथे त्यांना फसवणूक करण्यास भाग पाडले. याप्रकरणी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा एकच्या पथकाने तपास करत म्यानमारमधील सात पीडितांची सुटका करून मानवी तस्करीचे रॅकेट चालवणाऱया चौघांना अटक केली आहे.
ायानगर परिसरात राहणारा सय्यद हुसैन व त्याचा मित्र अम्मार लकडावाला हे दोघे उच्चशिक्षित आहेत. त्याच्या ओळखीतील आसिफ खान उर्फ नेपाळी व अदनान शेख यांनी त्यांना फेसबुक पंपनीत नोकरीचे आमिष दाखवले. तेथे गेल्यानंतर तेथील स्टीव्ह आण्णा व लिओ यांनी तरुणांना धमकावत बळजबरीने सायबर फ्रॉड करण्यास दबाव टाकला. पीडित तरुणांनी काम करण्यास नकार दिला असता त्या दोघांनी सुटका करण्यासाठी सहा लाख रुपये उकळले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखा 1च्या पथकाने मीरा-भाईंदर, सुरत व विशाखापट्टणम येथून चार जणांच्या मुसक्या आवळल्या.

























































