तळेरे- गगनबावडा महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत बंद

संततधार पावसामुळे सिंधुदुर्ग-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने गुरुवारी वाहतूक विस्कळीत झाली. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिह्यांना जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी करील गगनबावडा घाटात आज सकाळी दरड कोसळली. सुरक्षेच्या दृष्टीने 12 सप्टेंबरर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

रस्त्यावर मातीचा मोठ्या प्रमाणात ढिगारा साचल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. सकाळी आठ वाजल्यापासून घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. खबरदारी म्हणून प्रशासनाने येथील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर घाट परिसरासह सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.