
तमिळनाडूतही 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. रविवारी तमिळनाडूत 106 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1075 इतकी झाली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवला आहे. तमिळनाडूपूर्वी ओडिशा, पंजाब, महाराष्ट्र आणि तेलंगाणात लॉकडाऊन वाढवला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने चर्चा केली होती. सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली होती. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे 106 रुग्ण आढळले आहेत. त्यात 8 डॉक्टरांचाही समावेश आहे. 106 रुग्णांपैकी 16 रुग्ण इतर राज्यांचे आहेत.


























































