
तामीळनाडू येथील इरोडचे लोकसभा खासदार ए. गणेशमूर्ती यांनी लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून विष प्राशन केल्याची चर्चा आहे. डीएमके पक्षाने ए. गणेशमूर्ती यांच्या जागी इरोड येथून युवा नेते के. ई. प्रकाश यांना मैदानात उतरवले आहे. प्रकाश हे तामीळनाडूचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन याचे पुत्र उदयनिधी स्टॅलीन याच्या जवळचे मानले जातात.
लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने ए. गणेशमूर्ती यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. एमडीएमके नेत्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, डीएमके पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने ते मानसिक दडपणाखाली होते. त्यातून नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.
























































