तामीळनाडूच्या रोहितची आघाडी कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवव्या फेरीत एकटय़ाने आघाडीवर असलेल्या रोहित कृष्णा याने दहाव्या फेरीत आणखी एक चमकदार विजय मिळवत पोलंडच्या सेपर मिलोझला पराभूत करून 8.5 गुणांसह दुसऱया महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत आपली आघाडी कायम राखली आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आधीच्या फेरीत विजय मिळवून दोन नॉर्म मिळवणाऱया मयंक चक्रवर्तीला वियानी डिकुनाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे दहाव्या फेरीत त्याला संयुक्तरीत्या तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी ग्रँडमास्टर लक्ष्मण आर. आर. याने वेदांत पानेसरचा निर्णायक दहाव्या फेरीत पराभव केला.

18 वर्षीय रोहित कृष्णा याने पूर्ण एका गुणाने आपली आघाडी कायम राखत असतानाच वियानी अँटोनियो डिकुना, अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज आणि लक्ष्मण आर. आर. यांनी 7.5 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान राखले आहे. उद्या अखेरच्या अकराव्या फेरीत केवळ बरोबरी साधता आल्यास रोहितला विजेतेपद पटकावता येईल. अकराव्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला तरी सरस टायब्रेक गुणांमुळे त्याला विजेतेपदाची संधी आहे.

निकाल – दहावी फेरी – (व्हाईट व ब्लॅक यानुसार) – सेपर मिलोझ (पोलंड) (7 गुण) पराभूत वि. रोहित कृष्णा एस. (हिंदुस्थान) (8.5 गुण); वियानी अँटोनियो डिकुना (हिंदुस्थान) (7.5गुण) वि. वि. मयंक चक्रवर्ती (हिंदुस्थान) (7 गुण); आयुष शर्मा (हिंदुस्थान) (6.5गुण) पराभूत वि. अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज (बेलारूस) (7.5गुण);