अखेर राज्यपाल रवी यांना सुप्रीम कोर्टाची ताकद कळली! मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हाणला टोला

तामीळनाडू विधानसभेने मंजूर केलेली विधेयके रोखणारे राज्यपाल आर. एन. रवी यांनी अखेर दोन्ही विधेयकांना मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. त्यावरून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जोरदार हल्ला केला. राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाची ताकद कळली, असा टोला स्टॅलिन यांनी हाणला.

तामीळनाडू सरकारने 12,000 हून अधिक दिव्यांगांना नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोंदणी करण्याचा अधिकार देणारी दोन विधेयके मंजूर केली, मात्र ती विधेयके राज्यपाल रवी यांनी रोखली होती. त्यांच्या भूमिकेवर सरकारने आक्षेप घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. न्यायालयाच्या त्या दणक्यानंतर रवी यांनी दोन्ही विधेयकांना मंजुरी दिली आहे.