
सामना ऑनलाईन । चेन्नई
शालेय स्तरावरील त्रिभाषा सूत्राला तामीळनाडूतील डीएमके पक्षाने विरोध केला आहे. पक्षाचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी हिंदी सक्तीविरोधात पक्षाचे खासदार संसदेत आवाज उठवतील, असा इशारा दिला आहे.
तामीळमधील लोकांच्या रक्तातच हिंदी भाषा नाही. त्यामुळे हिंदीची सक्ती करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार कनिमोझी यांनीही तामीळनाडूमध्ये इंग्रजी आणि तामीळ भाषा शिकविल्या जातील असे म्हटले आहे. आम्ही हिंदीचा विरोध करीत नाही, पण या भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, असे कनिमोझी म्हणाल्या.


























































