
अभिनेत्री तनुश्री दत्ता इतकी वर्षे परदेशात राहिल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. नुकतेच तनुश्रीचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ते बघून ती बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तयार आहे, असे वाटते. ती हिंदी सिनेमांच्या चांगल्या ऑफरच्या शोधात आहे. कमबॅक करायचं तर दमदार भूमिकेतूनच करायचे, असे तिने ठरवले आहे. तनुश्रीने बॉलिवूडमध्ये मी टू चळवळ सुरू केली. त्यामुळे इंडस्ट्री हादरली. त्यानंतर आता इंडस्ट्रीतील तिचे पुनरागमन हा चर्चेचा विषय ठरला आहे.






























































