कोपरगावात म्युकरमायकोसीस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी टास्कफोर्स समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्तीनंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे लक्षण आढळून येत आहे. तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे.

आशुतोष काळे म्हणाले की, कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक झाला आहे. कोविडची बाधा झालेल्यांपैकी बहुतांशी रुग्ण इतर व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरीदेखील अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना विशेषतः कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना सावधगिरीच्या सूचना देऊन जनजागृती करावी व योग्य ती काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच संभाव्य कोरोना तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहेत. त्याबाबत देखील आरोग्य विभाग व प्रशासनाने गाफील न राहता त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना काळे यांनी दिल्या.

म्युकरमायकोसीस कोपरगाव तालुका टास्कफोर्स समिती अध्यक्ष म्हणून डॉ.कुणाल कोठारी, सदस्य म्हणून डॉ.अस्मिता लाडे, डॉ.अंजली फडके, डॉ,वैशाली बडदे, डॉ.कृष्णा फुलसौंदर यांची नेमणूक करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून डॉ.अजय गर्जे व सदस्य- डॉ.मयूर जोर्वेकर, डॉ. शंतनू सरवार, डॉ.वैशाली बडदे, सचिव म्हणून डॉ.अतिष काळे यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, संदीप रोहमारे, आदीसह डॉक्टर उपस्थित होते.