
देशातील नंबर वन आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सीने (टीसीएफ) कोरोना विषाणूच्या प्रकोपातही आपल्या विद्यमान कर्मचाऱयांना मोठा दिलासा देणारी घोषणा करतानाच बेकार पदवीधरांसाठीही आशादायक निर्णय घेतला आहे. भविष्यात टाटांची ही आयटी फर्म सुमारे 40हजार नव्या पदवीधर युवकांची भरती करणार आहे. मात्र या उमेदवारांना या वर्षी नियुक्तीपत्र दिले जाणार नाही. त्यासाठी किमान हे वर्ष प्रतीक्षा कारवी लागणार आहे असे टीसीएफने म्हटले आहे.
टीसीएफने नव्या भरतीची घोषणा करताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या फर्मच्या शेअर्स खरेदीत मोठा उत्साह दाखवला आहे. त्यामुळेच शुक्रवारी टीसीएफच्या शेअर्सच्या किमतीत 7.9 टक्क्यांची वाढ झाली आहे.























































