वृद्धाचा हार्टऍटॅकने मृत्यू, सहाजण मुंबई रुग्णालयात

334

मुंबई मॅरेथॉन आज जल्लोषात पार पडली. हजारो धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यात गजानन माजलकर (64) हेसुद्धा होते. या वयातही माजलकर यांनी हिरीरिने भाग घेतला होता पण दुर्देवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला. धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ मुंबई रुग्णालयात नेण्यात आले. पण तो पर्यंत खुप उशीर झाला होता. गजानन माजलकर हे एका बँकेतून निवृत्त झाले होते. नालासोपारा येथे कुटूंबिंयासोबत राहणाऱया माजलकर यांना मॅरेथॉनमध्ये धावण्याची प्रचंड आवड होती. ते यंदा चौथ्यांदा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीने मुंबई रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दाखल करून घेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुसऱया धावपटूवर ऍन्जोप्लास्टी

माजलकर यांच्यासह अन्य पाच धावपटूंना देखील छातीत दुखत असल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनाही मुंबई रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापैकी हेमंत ठक्कर (47) यांच्यावर प्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ अनिल कुमार यांनी ऍन्जोप्लास्टी केली. तर उर्वरित चौघांना तपासून सोडून देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या