
सामना ऑनलाईन । मुंबई
टाटा पॉवरने एम वॉर्ड म्हणजेच ट्रम्बे, मानखुर्द परिसरातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या कुटुंबांसाठी स्वस्त धान्य योजना सुरू केली आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे म्हणून ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार 27 हजारांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. टाटा पॉवरच्या सीएसआर निधीतून स्वस्त धान्य शिबिरे चालवली जात आहेत. यामध्ये संबंधित कुटुंबांना गहू दोन रुपये किलो, तर तांदूळ तीन रुपये किलो दराने मिळणार आहे. टाटा पॉवर नेहमीच आपल्या व्यवसायाबरोबरच समाजातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी काम करत असल्याचे कंपनीचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी सांगितले.























































