
सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूहाने सर्वात मोठी बोली लावली आहे. मात्र याचा अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समुहानेच केली होती. टाटा समुहाचे जे. आर. डी.टाटा यांनी याची सुरुवात केली होती. 1947 ला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एका राष्ट्रीय एअरलाईन्सची गरज भासू लागली आणि सरकारने एअर इंडियाची 49 टक्के भागिदारी खरेदी केली. 1953 सरकारने एअर कार्पोरेशन अॅक्टअंतर्गत एअर इंडियाची 100 टक्के भागिदारी खरेदी केली आणि एअर इंडिया सरकारी कंपनी झाली.
Tata Sons wins the bid for national carrier Air India. Tata Sons was the highest bidder. Union Home Minister Amit Shah-led ministerial panel has given approval to this bid: Sources pic.twitter.com/99OdR9LXCA
— ANI (@ANI) October 1, 2021
गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअर इंडियावरील कर्जाचा बोजा सतत वाढत आहे. एअर इंडियावर 38 हजार 366 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकारी खात्याने एअर इंडियाचे 500 कोटी रुपये थकवले आहेत. तसेच एअर इंडियाकडे एकूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती असून यात जमीन, इमारतींचा समावेश आहे.
तोटा वाढत चालल्याने मागील 20 वर्षांपासून एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावेळी 20 टक्के भाग विकण्याचा प्रयत्न होता. मात्र सरकारी अटी आणि कर्जामुळे डुबलेल्या एअर इंडियाला खरेदीसाठी कुणी पुढे येत नव्हते. तसेच 2017 मध्ये 74 टक्के भाग विकण्याचा विचार करण्यात आला होता. पुढे पूर्ण 100 टक्के कंपनी विकण्याचे निश्चित करण्यात आले.





























































