
सातारा शहरास पाणीपुरवठा करणाऱया कास धरणाच्या पाणीपातळीत महिन्यात 3 फुटांनी वाढ झाली आहे. अवकाळी आणि चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसामुळे जलसाठा वाढत आहे.
कास धरणातून प्रामुख्याने सातारा शहराच्या पश्चिम भागास पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी धरणात कमी पाणी राहिल्याने पाणी कपातीची वेळ आली होती. सध्या कास धरण पाणलोट क्षेत्रात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणास येऊन मिळणाऱया जलस्रोताच्या माध्यमातून धरणात मोठय़ा प्रमाणावर आवक वाढली. तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसही पडला.
ढगाळ वातावरण असल्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे कास धरणाची पाणीपातळी साडेआठ फुटांवरून साडेअकरा फूट झाली आहे. एप्रिल व मे महिन्यात पाऊस झाला नसता, तर कदाचित सातारकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागले असते. सध्या पुरेसा पाणीपुरवठा असल्यामुळे पाणीकपात टळली आहे.































































