
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करणार आहोत असे म्हणत त्रवणकोर देवस्वम मंडळाने (TDB) महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यास आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, देवासमोर सर्व समान असून जैविक आणि शारीरिक आधारावर महिलांना रोखू शकत नाही, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
शबरीमालाच्या त्रवणकोर देवस्वम मंडळाचे सदस्य ए पद्मकुमार म्हणाले की, इतर धार्मिक संस्थांकडून पाठिंबा मिळाल्यानंतर आम्ही फेरविचार याचिका दाखल करू.
We will go for a review petition after getting support from other religious heads: Travancore Devaswom Board (TDB) president, A Padmakumar, on Supreme Court allows entry of all women in Kerala’s #Sabarimala temple. pic.twitter.com/9f0BVTlA7h
— ANI (@ANI) September 28, 2018
यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील महिलांचा शबरीमाला मंदिरातील प्रवेश सहजासहजी होणार नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे.



























































