
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली शिक्षिकेची 49 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या शिक्षिका आहेत. गेल्या महिन्यात त्या घरी असताना त्यांना एका नंबरवरून मेसेज आला. एकाने महिलेला तो शेअर ट्रेडिंग पंपनीतून बोलत असल्याचे भासवले. शेअर मार्पेटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने गुंतवणूक करण्यास होकार दिला. होकार दिल्यावर त्यांना एक व्हॉटस्अॅप ग्रुपची लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपवर विविध शेअरची माहिती दिली जात होती.