ज्ञानदानासाठी ‘मोबाईलदान’, शिक्षिकेची ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी धडपड

428

कोरोना विषाणूमुळे शालेय शिक्षणही अडचणीत आले. विद्यार्थांना शिकविण्यासाठी ऑनलाइनचा मार्ग निवडावा लागला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडे सध्या स्मार्ट फोन उपलब्ध नाही त्या विद्यार्थ्यांनाही कोरोनावर मात करून ज्ञानार्जन करण्यासाठी मोबाईलची गरज आहे. म्हणून ज्ञानदानासाठी मोबाईलदान करा, असे आवाहन एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने केले आहे.

कोरोनाच्या संकटात कुणाचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल मिळाला तर त्यांचे शिक्षण सुरू राहील या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नीलिमा इंदुलकर यांनी घरातील जुने वापरात नसलेले स्मार्ट फोन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी दान करा असे आवाहन त्यांनी केले असून त्याला शिक्षणप्रेमी दानशूर मंडळींकडून प्रतिसादही मिळू लागला आहे. नाचणे येथील माजी सरपंच संतोष सावंत यांनीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता मोबाईलदानाचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या