
मागील दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 10 ऑक्टोबरला होणार असून या परीक्षेसाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची मुदत 25 ऑगस्टला संपणार आहे.
राज्यभरात टीईटीची परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने घेण्यात येणार असून त्यासाठी 3 ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित आदी शाळांमध्ये लवकरच 6 हजार 100 नवीन शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भावी शिक्षकांना ही परीक्षा देणे बंधनकारक आहे.
असे आहे टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक
1. ऑनलाइन अर्जासाठी मुदत – 25 ऑगस्टपर्यंत
2. प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध – 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
3. टीईटी पेपर 1 – 10 ऑक्टोबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1
4. टीईटी पेपर 2 – 10 ऑक्टोबर, दुपारी 2 ते 4.30






























































