शिक्षक भरती घोटाळा- राज्य शासनाचे 150 कोटींचे नुकसान, तीन उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल; हायकोर्टात धक्कादायक माहिती सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक भरती घोटाळ्याने राज्य शासनाचे तब्बल 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तीन उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयात सादर झाली आहे.

सरकारी वकील ओंकार चांदुरकर यांनी ही माहिती न्यायालयात दिली. नाशिक येथे 12 मार्च रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू आहे. याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असेही ऍड. चांदुरकर यांनी न्यायालयाला सांगितले. हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 30 मार्चपर्यंतची मुदत देत न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने ही सुनावणी 10 एप्रिलपर्यंत तहकूब केली. या सुनावणीला शिक्षण आयुक्त हजर होते.