
शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकाच्या प्रेमात पडून लग्न केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना समोर आली आहे. येथे शिक्षकाने आपल्या निम्मयावयाच्या विद्यार्थीनीसोबत लग्न केले आहे. शिक्षकाने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट करत याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. वाचून आश्चर्य वाटेल.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामागचे कारण देखील तितकेच लक्षवेधी आहे. विद्यार्थीनीने फी न भरल्यामुळे एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याशी लग्न केले. विद्यार्थिनी त्या शिक्षकाकडे शिकायला यायची पण फी भरायला तिच्याकडे पैसे नव्हते तरी शिक्षकाने एकदाही तिचे शिक्षण थांबवले नाही. पण अनेक महिने उलटून गेले तरीही पैसे न भरल्याने फीची रक्कम सुमारे 10 हजार रुपये झाली.
शिक्षकाने विद्यार्थिनीकडे फीसाठी दहा हजार रुपये मागितले. यावर तिने मी एवढे पैसे भरण्यास असमर्थ असल्याचे शिक्षकांना सांगितले. यावर शिक्षकाने विद्यार्थीनीला एकतर फी भरावी अन्यथा माझ्याशी लग्न करावे अशी अट घातली. विद्यार्थिनीकडे फीसाठी पैसे नसल्यामुळे बळजबरीने शिक्षकाशी लग्न करावे लागले. शिक्षकांने लग्नानंतर त्यांचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लग्नाचे कारणही सांगितले. यात शिक्षिकेने सांगितले की विद्यार्थिनीने तिची फी भरली नाहीय त्यामुळेच मी विद्यार्थिनीशी लग्न केले आहे. आता मी फीचे पैसेही वसूल करण्यासाठी तिच्याकडून घरची कामे करवून घेईन असे त्याने म्हंटले आहे. त्यांमुळे हे प्रकरण सध्य़ा प्रचंड व्हायरल होत आहे.

























































