जामखेड: शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या

teacher-sucide

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे शिक्षिका आसलेल्या सौ. विजया नितीन वराट (वय 40) यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विजया वराट यांच्यावर आज जामखेड अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आले. त्यांना एक मुलगी एक मुलगा सासू सासरे, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.