शिक्षकांच्या सुट्टीचा निर्णय जाहीर करा, कपिल पाटील यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱयांना सात दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षकही प्रवास करून शाळेत येतात. विद्यार्थी जास्त वेळ त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्टीचा निर्णय लवकर जाहीर करा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने अद्याप कोरोनाची गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. शिक्षण आयुक्तांनी शिफारस करूनही शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सुट्टीचा निर्णय जाहीर केलेला नाही. उच्च शिक्षण किभागाने तीन दिकसांपूर्कीच सुट्टीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागानेही 31 मार्चपर्यंत शिक्षक क शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टी द्याकी. परीक्षादेखील पुढे ढकलाक्यात. केवळ पगारपत्रके 20 तारखेच्या आत ट्रेझरीला पोचतील याची काळजी घ्याकी, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे.