
सामना ऑनलाईन । दुबई
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘टीम इंडिया’चे कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. स्वतः धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांनी चुकीच्या प्रकारे बाद ठरवल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले. मात्र पंचांविरूद्ध जाहीरपणे बोलल्यास शिस्तभंगाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्यामुळे धोनीने पंचांच्या चुकीवर थेट भाष्य करणे टाळले.





























































