चला, हॅटट्रीक करूया! आज आयर्लंडविरुद्ध अखेरची लढत, निर्भेळ यशासाठी हिंदुस्थान सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या दोन्ही लढतींत विजयाची नोंद केल्यामुळे उत्साहित असलेली टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदुस्थानच्या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आयोजित या छोटेखानी आयर्लंड दौऱयातील अखेरच्या सामन्यात बेंच स्ट्रेंथला (राखीव खेळाडू) संधी देण्याची शक्यता आहे.

आयर्लंडच्या दौऱयामुळे हिंदुस्थानी क्रिकेटला किती फायदा झाला याची कल्पना नाही, पण जसप्रीत बुमराने हिंदुस्थानी संघात पुनरागमन केले हीच एक आनंदाची बाब आहे. बुमराच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळविण्यात आली आणि या मालिकेत हिंदुस्थान निर्भेळ यश मिळविणार, हेसुद्धा निश्चित आहे. या मालिकेतून हिंदुस्थानी संघात काही खेळाडूंनी निवड होण्याची शक्यता होती. त्यानुसार प्रसिध कृष्णा आशिया कपसाठी निवडला गेला आहे. अखेरच्या या सामन्यात प्रसिध कृष्णाला विश्रांती देत जितेश शर्मा, शाहबाज खान आणि आवेश कुमारला संधी देण्याची शक्यता आहे. हे दोघेही अद्याप एकही सामना खेळलेले नाही. ही मालिका त्यांच्यासाठी केवळ पिकनिक ठरू नये अशी अपेक्षा आहे.

या दौऱयात रिंकू सिंगला ंिहंदुस्थान संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. शिवम दुबेलाही तीन वर्षांनंतर संघात पुनरागमन करता आले. रिंकू आणि शिवमला पहिल्या दोन्ही लढतींत खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे अखेरच्या लढतीत बेंच स्ट्रेंथ असलेल्या मुकेश, आवेश आणि शाहबाजपैकी संघ व्यवस्थापन कुणाला खेळवते हे पाहता येईल. याच संघातील बहुतांश खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे अद्यापही बाहेर बसलेल्या खेळाडूंना आजमावणे क्रमप्राप्त आहे. हे खेळाडू सलग सात सामन्यात हिंदुस्थानी संघात आहेत, पण या तिघांना अद्याप एकही संधी मिळालेली नाही. एकही सामनाही न खेळता आशियाई स्पर्धेत खेळणे, हे त्यांच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे अखेरच्या लढतीत वेगवान गोलंदाजांना खेळविणे महत्त्वाचे आहे.

सॅमसन-अर्शदीपला विश्रांती?

संजू सॅमसनला विश्रांती देत जितेश वर्माला संधी देण्याची शक्यता आहे. सॅमसनचे संघातील स्थान अद्यापही अनिश्चित असल्यामुळे संघाबाहेर बसणे त्याला आवडणार नाही. तसेच अर्शदीपच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे आवेश किंवा मुकेशला आजमावण्याचे धाडस संघव्यवस्थापन घेऊ शकते.

संभाव्य संघ

– हिंदुस्थान ः जसप्रीत बुमरा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंह, रवी बिष्णोई.
– आयर्लंड ः पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अॅण्डी बालबर्नी, लॉर्कन टकर, हॅरी टॅक्टर, कर्टिस पॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकर्थी, व्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.