सूर्या तळपला, हर्षल चमकला; टीम इंडियाचे निर्भेळ यश,विंडीजला टी-20 मालिकेतही लोळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या टीम इंडियाने वेस्ट इंडीजला तिसऱया टी-20 क्रिकेट सामन्यातही 17 धावांनी लोळवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले. हिंदुस्थान-विंडीज दरम्यान आतापर्यंत 7 टी-20 मालिका झाल्या असून त्यात हिंदुस्थानने तिसऱयांदा निर्भेळ यश मिळवण्याचा पराक्रम केला, हे विशेष. याचबरोबर लागोपाठ 9 टी-20 मालिका जिंकून हिंदुस्थानने पाकिस्तानचीदेखील बरोबरी केली. सलग सर्वाधिक 12 मालिका जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तान संघाच्या नावावर आहे.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजला 9 बाद 167 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून निकोलस पुरनने 47 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारासह 61 धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. रोवमन पॉवेल (25) व रोमारियो शेफर्ड (29) यांनी थोडाफार प्रतिकार केला. हिंदुस्थानकडून हर्षल पटेलने 3, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. वादळी अर्धशतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव सामानावीर ठरला. त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 5 बाद 184 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती.

रोहितच्या जागी आलेल्या व्यंकटश अय्यरने सूर्यकुमारसोबत केस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या दोघांनी षटकारांचा पाऊस पाडला. अखेरच्या षटकात सूर्यकुमारने अर्धशतक पूर्ण केले. त्याने त्याने 31 चेंडूंत 7 षटकार आणि 1 चौकारासह 65 धाकांची लयलूट केली. अखेरच्या चेंडूकर सूर्यकुमार बाद झाला. व्यंकटेशने 19 चेंडूंत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धाका चोपल्या. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 37 चेंडूंत 91 धावांची वादळी भागीदारी केल्याने हिंदुस्थानला 184 धावसंख्येपर्यंत मजल  मारता आली.

संक्षिप्त धावसंख्या

हिंदुस्थानः20 षटकांत 5 बाद 184

वेस्ट इंडिजः 20 षटकांत 9 बाद 167