हळव्या नात्याच्या ‘खिचिक’चा टीझर लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नावापासूनच वेगळेपण असलेल्या खिचिक या आगामी चित्रपटात हळव्या नात्याची गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, रंजक कथा चित्रपटातून उलगलणार असल्याचं या टीझरमधून जाणवत आहे.

कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत

लाँच करण्यात आलेल्या टीजरमध्ये अभिनेता प्रथमेश परब दिसत आहे. पाठमोरी जाणारी मुलगी, तिच्या हातातून पडणारा कागदाचा बोळा आणि त्यानंतर ‘मी चाललो तिच्याकडे, सय वाजवली गिटार आता’ हा संवाद येतो. त्यामुळे टीजरमधून ही भावस्पर्शी कथा असेल असे म्हणता येईल. मात्र या टीजरमुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.

पाहा टीझर-