‘बाहुबली’ प्रभासच्या ‘साहो’चा ‘चॅप्टर 2’ पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बाहुबली या एका सुपरहिट चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता प्रभासच्या आगामी साहो या चित्रपटाचा चॅप्टर 2 नावाचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूरच्या वाढदिवसाचं निमित्त साधून हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. एक मिनिट आणि दोन सेकंद इतक्या लांबीच्या या व्हिडीओमध्ये श्रद्धा अॅक्शन लूकमध्ये दिसतेय.

या चित्रपटाचा नायक प्रभासही यात करारी दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यामागील काही दृश्यंही दिसत असून ती अतिशय थरारक आहेत. हा बिगबजेट चित्रपट सुजीतने दिग्दर्शित केला असून त्यात प्रभाससोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, एव्हलिन शर्मा, मंदिरा बेदी असे तगडे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ-