
सामना ऑनलाईन । ठाणे
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मागे लागलेला लेटमार्क काही पिच्छा सोडताना दिसत नाही. शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-ऐरोली रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक उशिराने सुरू असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला रेल्वेच्या गोंधळाचा फटका बसला आहे.
गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेवर वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. उपनगरीय रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात एका रेल्वे प्रवाराशाने डीआरएम, मुंबईकडे तक्रार केली असून नुकसान भरपाईसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र प्रवाशांचा अद्यापही कमी झाला नसल्याचे आणि रेल्वेचा गलथान कारभार सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.



























































