नया है यह! ह्रदयाचे ठोके मोजणारी अंगठी

दरवर्षी टाईम मॅगझिनतर्फे जगभरातील स्मार्ट आविष्कारांची घोषणा होते. यावर्षीही असे 100 इनोव्हेशन निवडण्यात आले आहेत. यामध्ये लहान मुलांना मदत करणारा रोबोट, टूथपेस्टची रिसायकल टय़ूब आणि आरोग्याची काळजी घेणारे अनेक गॅझेट्स आदींचा समावेश आहे. प्रत्येक आविष्काराचे महत्त्व, उपयुक्तता, परिणाम आदी मुद्दे विचारात घेऊन त्यांची टॉप लिस्टमध्ये निवड झाली आहे.

नखांची काळजी

कोरोनाच्या काळात ब्युटीपार्लर, सलूनमध्ये जाणं लोक टाळतात. त्यामुळे घरबसल्या ही सुविधा मिळवून देण्याचा आविष्कार शोधण्यात आला आहे. नखांची काळजी घ्यायची असेल तर इच्छुकांनी आपल्या नखांचे पह्टो वेबसाईटवर टाकायचे. त्यानंतर थ्रीडी मॉडेलिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कंपनी आपल्या नखांवर फिट बसेल असे जेल पॉलिश स्टीकर पाठवते.

आरोग्याची अंगठी

सर्वांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारी अंगठी तयार करण्यात आली आहे. ही अंगठी बोटात घातल्यानंतर सेन्सरच्या सहाय्याने हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान, निद्रेचे प्रमाण समजते.

रिसायकल होणारी टय़ूब

टूथपेस्ट वापरून झाल्यावर रिकाम्या टय़ूब फेकून दिल्या जातात. या टय़ूब प्लॅस्टिक आणि अॅल्युमिनियमच्या बनलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. यावर उपाय शोधताना टॉम्स मॅने याने नवी टय़ूब तयार केली आहे. या टय़ूबमध्ये रिसायकल पॉढ़िलएथिलीनचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रिसायकल होईल असं प्लॅस्टिक तयार होतं.

आपली प्रतिक्रिया द्या