
जगभरात सतत नवनवीन तंत्रज्ञान येत असतं आणि त्यावर आधारित आविष्कार आपल्याला थक्क करतात. नव्या तंत्रज्ञानाचं असंच एक प्रॉडक्ट तयार करण्यात आलंय. कडक उन्हात थंडा थंडा कुल ठेवेल असा कपडय़ांमध्येच वापरता येणारा एसी तयार करण्यात आलाय. हा एसी मोबाईल फोनहूनही लहान आहे, जो आपल्यासोबत कुठेही घेऊन जाता येऊ शकतो.
नवा वियरेबल्स एसी नेकबॅकप्रमाणे गळ्यात घालता येतो. उन्हाळ्याच्या दिवसांत स्पोर्ट्सची खास आवड असलेले लोक याचा वापर करू शकतात. याचा वापर मैदानी खेळात, क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळ खेळताना केला जाऊ शकतो. त्यासाठी खास टी-शर्टची वगैरे गरज नाही. सोनीचा हा एसी सिंगल चार्जमध्ये अनेक तास वापरला जाऊ शकतो. त्यात अधिक उष्णता शोषून तापमान कमी करण्याची क्षमता आहे. म्हणजेच कुलिंगच्या तुलनेत हा अधिक पॉवरफुल आहे.




























































