
बोपोडी येथील सरकारी जमीन एकाला हस्तांतरीत करण्याचे आदेश केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बोपोडीतील सरकारी जमीन एका खासगी व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा आदेश देत येवले यांनी नियमबाह्य काम केल्याचे उघड झाल्याने त्यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी येवले यांनी वरिष्ठ वकील अॅड. हर्षद निंबाळकर आणि अॅड. शिवम निंबाळकर यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.




























































