‘तेजस एक्सप्रेस’ आता अधिक वेगवान होणार, शुक्रवारी झाली चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकण रेल्वेमार्गावरुन धावणारी अत्याधुनिक तेजस एक्सप्रेस आता अधिक वेगवान होणार आहे. त्यासाठीच शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी दरम्यान तेजस एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान रिकामी तेजस एक्सप्रेस ताशी सुमारे 120 किमी वेगाने धावली.

तेजस एक्सप्रेस हि रेल्वेगाडी अधिक वेगवान करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी शुक्रवारी झालेल्या चाचणीतही ती उत्तीर्णही झाली. शुक्रवारी पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन प्रवाशांविरहीत तेजस एक्सप्रेस सुसाट सुटली. रत्नागिरी रेल्वेस्थानकात तेजस एक्सप्रेस सकाळी 10 वाजून 22 मिनिटे झाली असताना आली. रत्नागिरीतून सकाळी साडेदहा वाजता सुटलेली तेजस करमाळीला दुपारी 1 वाजून 33 मि.ला पोहचली.करमाळीवरुन परतीच्या प्रवासासाठी निघालेली तेजस एक्सप्रेस सायंकाळी 6 वा.15 मि. आली.तेजस एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली.प्रवाशांशिवाय रिकामी गाडी ताशी 120 किमी वेगाने धावत होती.बिगर मान्सून काळात तेजस ताशी 110 किमी वेगाने धावते.मान्सून मध्ये वीर ते कणकवली ताशी 75 किमी आणि कणकवली ते करमाळी ताशी 90 किमी धावते. आजच्या यशस्वी चाचणी नंतर तेजस एक्सप्रेस सुपरफास्ट ठरणार.