जानेवारी मध्ये मुंबई-अहमदाबाद ट्रेन धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tejas-26

गेल्या अनेक दिवसांपासून खासगी तत्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनबद्दल ऐकायला मिळत होतं. ही खासगी ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणार असून 19 जानेवारी पासून ही ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या ट्रेनला उशीर झाला होता. यामुळे ट्रेनची सुरूवात केव्हा होणार हे निश्चित झाले नव्हते. आता आयआरसीटीसीने 19 जानेवारीपासून ही ट्रेन नियमतपणे धावणार असल्याची माहिती दिली आहे.

आयआरसीटीसी या गाडीचे पूर्ण संचलन करणार असून, तिकीटविक्रीही आयआरसीटीसीच करणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या अंतरासाठीचे चेयरकार श्रेणीचे भाडे 1,200 रुपये तर एक्झिक्युटीव्ह चेयरकार श्रेणीसाठीचे भाडे 2,100 रुपये असण्याची शक्यता आहे. सुरतवरून मुंबई किंवा अहमदाबादसाठी चेयरकारश्रेणीचे भाडे 700 रुपये जर एक्झिक्युटीव्ह चेयरकार श्रेणीचे भाडे 1,000 ते 1,200 रुपये भाडे असू शकते.  ट्रेनसाठीचे तिकीट  बुकींग 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही ट्रेन दिवसातून दोनवेळा धावणार आहे. ही ट्रेन अहमदाबादहून सकाळी 6:40 मिनिटांनी सुटेल आणि  1:10 मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचेल.  मुंबई सेंट्रल वरून ही ट्रेन दुपारी 3:40 मिनिटांनी सुटेल आणि रात्री 9:55 मिनिटांनी अहमदाबादला पोहचेल.

ह्या ट्रेनने करीता प्रवाशांच्या सुविधेकरीता मुंबई सेंट्रल येथे  विशेष तिकीट कक्ष सुरू केला आहे. सुरत रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सी.आर.गरूडा यांनी सांगितले की तिकीट विक्री ही आयआरसीटीसी करणार असून त्यांना तिकीटविक्रीसाठी योग्य ती जागा स्थानकामध्ये दिली जाईल.