Bihar Election Result 2025 – लालटेन शाम को जलता है… निकालावर तेजस्वी यादव यांची सूचक पोस्ट

बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाला सुरुवात झाली असून निवडणूक आयोगानुसार सध्या राज्यात भाजप व जदयू आघाडीवर आहेत. NDA ला सध्या स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर राष्ट्रीय जनता दल 36 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजदचा सुपडा साफ झाला असे बोलले जात आहे. असे असताना राजचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी ट्विटवर एक सूचक पोस्ट शेअर करत संध्याकाळपर्यंत निकाल बदलतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

तेजस्वी यादव यांनी एक पोस्ट शेअर करत निवडणूक आयोग खोटो आकडे दाखवत असल्याचा आरोप केला आहे. ”ग्राऊंड रिपोर्टनुसार राजदचे उमेदवार पुढे आहेत तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार NDA आघाडीवर आहे. हिच परिस्थिती राज्यातील साठ पेक्षा जास्त जागांवर आहे. या लोकांना महागठबंधनचे मानसिक खच्चीकरण करायचे आहे. एकदा का मानसिकरित्या आपण पराभव स्वीकार केला तर ते संध्याकाळी त्यांचा खेळ खेळतील. त्यामुळे आपला झेंडा रोवून उभे रहा”, असे तेजस्वी यादव यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच त्यांनी ”घाबरू नका लालटेन (राजदचे चिन्ह) संध्याकाळीच पेटवले जाते”, असेही म्हटले आहे.