
सामना ऑनलाईन । हैदराबाद
जेईई परीक्षेत अपयश आल्याने तेलंगणातील एका 19 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. वडिलांच्या सर्व्हिस रिल्व्हॉवरमधून स्वतःवर गोळ्या झाडून आतमहत्या केली. सोमवारी परीक्षेच्या निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. साहील मेहरुद्दीन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील एटीएम कॅश व्हॅनचे सुरक्षा रक्षक आहे. त्यांना कंपनीकडून रिल्व्हॉवर देण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले तेव्हा साहील रक्त्याच्या थारोळ्यात पडला होता. परीक्षेत अपयश आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































